#रेणुरसोई
#राज #कचोरी #सोडा न घालता
राज कचोरी
खूपच चवदार आणि स्वादिष्ट 😋😋😋
नाव जरी कचोरी असले ... तरी ही कचोरी अजिबात तेलकट नाही.... छान हलकी व खुसखुशीत लागते....
ही कचोरी मी आमच्या घरच्या आवडीप्रमाणे केली आहे, कचोरी छान फुलली होती व शेवटपर्यंत कुरकुरीत लागली आणि मी वापरलेल्या सारणामुळे हलकी पण आहे ...
हवी तशी हलकी व खुसखुशीत कचोरी तयार करण्यासाठी ... मला तीनदा प्रयत्न करावा लागला ...
तिसरा प्रयत्न खूप चांगला झाला ...
आतील सारण तुम्ही पूर्णपणे तुम्हाला आवडेल तसे घेऊ शकता....
यातील सारणाचे सगळे प्रकार घरी केलेले आहे ते....
साहित्य ....
कचोरीसाठी ...
*जाड रवा ...1 वाटी
(एक वाटी ... 200 मि.ली.)
*कणीक... 2 टेबलस्पून (ऐच्छिक)
*मैदा ... 1 टेबलस्पून
*कोमट पाणी...
* रवा आणि मैदा एकत्र करून करावे त्यात हळूहळू पाण्याचा वापर करून कणिक भिजवून घ्या. ही कणीक फार घट्ट पण नको वा खुप मऊ पण नको.
मी 1/2 वाटी पेक्षा थोडे जास्त पाणी वापरले आहे.
*झाकून ठेवा आणि 30 मिनिटे मुरू द्या
घ्
* 30 मिनिटांनंतर पुन्हा कणीक मळून घ्यावे .... समान 12 गोळा भाग करा.
* लोखंडी कढईत तेल गरम करावे.
थोडे तेलाचे बोट लावून पातळ पुरी लाटून घ्या.
* आता या पुरीला तळा, तळताना पुरी ची खालील बाजू तेलात असावी.पुरी कढईत घालताना गॅस हाय फ्लेमवर असावा, झाऱ्याने हळूवारपणे दाबत तळा, त्यामुळे कचोरी लगेच छान गोल गरगरीत फुलते .
* आता गॅस मध्यम आचेवर करा व कचोरी
दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन रंगावर तळा.
* अशा प्रकारे सर्व कचोऱ्या तळा.
एका प्लेट मध्ये ठेवून त्यांना गार होऊ द्या.
सारण भरण्यासाठी ...
*उकडलेले आणि चिरलेले बटाटे ...2 वाटी
*उकडलेले देशी हरबरे.... 1 वाटी
* घरचे ताजे दही ... 3 वाटी
* शेव ... 6 टेबलस्पून
* खारी बुंदी ... 6 टेबलस्पून
* गोड आणि आंबट चिंचेची चटणी.... 1/2 वाटी
*हिरवी मिरची कोथिंबीर चटणी ... 1/4 वाटी
*कुस्करलेली पापडी .... 1 वाटी
*डाळिंब दाणे... 3 टेबलस्पून
*चिरलेली कोथिंबीर .... 2 टेबलस्पून
* मीठ ... 1टीस्पून
*लाल तिखट ... १ टीस्पून
*जिरे पूड ... 1टीस्पून
*चाट मसाला ... 1 टीस्पून
सर्व्ह करताना ...
* कचोरी मध्यभागी थोडीशी फोडून छिद्र करा.
* थोड्या उकडलेल्या बटाट्याच्या फोडी आणि वाफवलेले हरबरे घाला .... थोडे मीठ, तिखट , जिरेपूड आणि चाट मसाला भुरभुरावे.
* थोडी पापडी, बूंदी, शेव आणि हिरवी तसेच चिंचेची चटणी घाला.
भरपूर दही घाला. अशा प्रकारे कचोरी छान पुर्ण भरली पाहिजे.
* पुन्हा एकदा थोडी खारी बूंदी, शेव, पुन्हा दही घालून घाला.
*वरून पुन्हा चटणी, कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे घाला.
*लगेच सर्व्ह करा ....
टिप...जर कचोरी फुलुन आली व सर्व्ह करताना नरम पडली तर परत एकदा हाय गॅस वर तळायची.... छान फुलते व कुरकुरीत होते
शेव आणि पापडीची सविस्तर रेसिपी पुढील लिंकवर
http://www.renurasoi.com/2019/06/shevgathipapadi.html?m=1
खालील लिंकवर खारी बूंदीची सविस्तर रेसिपी ...
http://www.renurasoi.com/2020/05/khari-boondi.html?m=1
ताजे घरगुती दही साठी खालील लिंकवर कृती पहा ..
http://www.renurasoi.com/2018/09/homemade-curd.html?m=1
Khup sundar👍🏻🙏🏻
ReplyDeleteThank you 🙏
Delete