#रेणूरसोई
चिरोटे
घरोघरी दिवाळीत बनणारा पारंपारिक पदार्थ आहे....
उत्तम चिरोटे हलके व खुसखुशीत तर हवेतच पण ते खाल्ल्यावर तोंडात तुपकटपणा यायला नको... छान सगळे पदर सुटले पाहिजेत त्याच्यावरच हलकाच असा साखरेचा गोडवा....😋😋😋 खुप सुंदर लागतात असे चिरोटे👍
उत्तम चिरोटे व्हावेत म्हणून भरपूर टिप दिल्या आहेत...
साहित्य...
*मैदा... 3 वाटी
1 वाटी...150 मिली.
*रवा... 2 टेबलस्पून
मोहन म्हणून
*तुप...पातळ व गरम करून...3 टेबलस्पून
*मीठ....चिमुटभर
*साखर... 2 वाटी
*लिंबू रस...1 टिस्पून
पोळी वर लावण्यासाठी...
*पातळ साजूक तुप... 6 टेबलस्पून
*मैदा...4..5टिस्पून
*साजूक तुप... तळण्यासाठी
*केशरी रंग... चिमुटभर/थोडा... ऐच्छिक
कृती...
*मैदा,रवा, व मीठ छान एकत्र करून घ्या नंतर त्यात पातळ तूप कडकडीत गरम करून घाला. छान मिसळून घ्या.
*त्यातील एक वाटी पीठ बाजूला काढा व उर्वरित पीठ हळू हळू पाणी घालून छान घट्ट भिजवून घ्या. 1 वाटीपेक्षा थोडे कमी पाणी लागले मला.
*बाजूला काढलेले एक वाटी पीठ थोडासा केशरी रंग घालून छान एकत्र करा व अतिशय कमी पाणी घालून घट्ट भिजवून घ्या.
*दोन्ही भिजवलेले पीठ झाकून 30 मिनिटे मुरू द्या.
*मग पांढऱ्या पिठाचे 4 एक सारखे भाग करा. केशरी पिठाचे दोन भाग करा.
*दोन पांढऱ्या पिठाच्या पोळ्या शक्य तितक्या पातळ लाटून घ्या व एक केशरी पोळी पण पातळ लाटून घ्या.
*सर्वप्रथम एक पांढरी पोळी पोळपाटावर ठेवा त्याच्यावर तीन ते चार टिस्पून पातळ तूप हाताने पसरून पुर्ण पोळी वर कोरडा मैदा भुरभुरा/घाला.... पुन्हा हाताने पसरवून त्यावर केशरी पोळी ठेवा. त्याच्यावर तीन ते चार टिस्पून पातळ तूप हाताने पसरून पुर्ण पोळी वर कोरडा मैदा भुरभुरा/घाला.... पुन्हा हाताने पसरवून त्यावर पांढरी पोळी ठेवावी.त्याच्यावर तीन ते चार टिस्पून पातळ तूप हाताने पसरून पुर्ण पोळी वर कोरडा मैदा भुरभुरा/घाला.... हाताने पसरवून या तिन्ही पोळींचा घट्ट रोल करून घ्या.
रोल एकसारखा करून घ्या.
दोन्ही बाजूंनी छोटे तुकडे कापून घ्या.
उरलेल्या रोल चे एकसारखे 12 तुकडे सुरीने कापून घ्या. एका भांड्यात झाकून ठेवावे.
*अशाच प्रकारे दुसरी पोळी पण करून, रोल करून तुकडे करून घ्यावेत.
*मग कापलेली केशरी पांढरी बाजु वर येईल असे पाहून 3 ते 4 इंचाची एकसारखी पुरी लाटून घ्या. फार पातळ नको.... नाही तर पदर सुटणार नाहीत.
*लोखंडी कढईत तुप तापवून, मंद आचेवर तुपात एका वेळी दोन किंवा तीन असे गुलाबी रंगावर तळून घ्या.
मंद आचेवर तळल्यामुळे आतुन पुर्ण पदर सुटतात.
* अशा प्रकारे पुर्ण चिरोटे तळून घ्या.
पाक करण्यासाठी....
*एका जाड बुडाच्या कढईत किंवा पातेल्यात साखर घालून साखर बुडेल एवढे पाणी घाला.
मध्यम आचेवर सतत ढवळत रहा. साखर विरघळल्यावर पाकाला उकळी येईल तेव्हा घड्याळात वेळ पाहून घ्या व उकळी आल्यावर आठ ते दहा मिनिटे झाली की गॅस बंद करावा. लिंबू रस घालून छान एकत्र करून घ्या.
*लगेचच तळलेले 3...4 चिरोटे घालून दोन्ही बाजूंनी पाक लागल्यावर चिमट्या च्या साह्याने बाहेर काढून एका मोठ्या ताटात ठेवा. पुन्हा दुसऱ्या चिरोटे घाला.
*अशा प्रकारे सगळे चिरोटे पाकातून घालून ताटात पसरवून ठेवा एक दीड तासात छान कोरडे होतात.
*घट्ट झाकणाच्या स्टीलच्या डब्यात भरून ठेवा सात आठ दिवस छान राहतात.
टीप...
1)कॉर्नफ्लोअर किंवा तांदूळ पीठ तुपात कालवून पण पोळीवर पसरवतात पण असे केल्याने तुपकट चव येते व तळताना पीठ सुटून तूप जळते.
2) साजूक तूप न वापरता सनफ्लॉवर तेलात तळले तरी चालेल.
3) पाक न करता गरम चिरोट्यांवर भरपूर पिठीसाखर घालून पण करता येतात.
4) कधी कधी एक तासात सुकले नाही तर बऱ्याच वेळा नंतर सुकतात.
5) जर पाक जास्त घट्ट होऊन साखर जमली तर एक-दोन टिस्पून पाणी टाकून पुन्हा गरम करून घ्या.
Comments
Post a Comment