गुळाचे शंकरपाळे
#रेणूरसोई
हे शंकरपाळे अतिशय खमंग व खुसखुशीत लागतात.
शंकरपाळे दूध, चहा व कॉफी कशा सोबत ही छान लागतात.
दिवाळीच्या चटक-मटक फराळाचं सोबत मध्येच थोडेसे गोड खायला मधुर लागतात.
साहित्य-
*गूळ...1 वाटी
1 वाटी... 150 मिली.
*तुप...1/2 वाटी
*पाणी...3/4 वाटी
*मीठ... चिमूटभर...ऐच्छिक
*बेसन... 3 टेबलस्पून
*कणिक... 3.5 ते 4 वाटी
कृती...
* प्रथम भांड्यात पाणी गरम करायला ठेवा. त्यामध्ये चिरलेला गूळ , तूप व मीठ घाला. अधूनमधून ढवळत गूळ पूर्ण विरघळून घ्या. गॅस बंद करा.
*हे पाणी पूर्ण गार झाल्यावर त्यात कणिक + डाळीचे पीठ मिसळून गोळा करा आणि तासभर झाकून ठेवा. कणिक कमी जास्त प्रमाणात लागू शकते.
*नंतर त्याची मध्यम जाडीची पोळी लाटून शंकरपाळे कापा.
*एका कढईत तेल तापवून ,तेल गरम झाल्यावर आच कमी करून, खमंग तळून घ्यावे.
* हे शंकरपाळे गार झाल्यावर छान खुसखुशीत लागतात. पुर्ण थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा.
We tried this recipe at home. Finger licking delicious shankarpale!!! Non greasy and very light. This is my breakfast, lunch and dinner now.
ReplyDeleteThank you so much 🙏🏼
Delete