गोड शंकरपाळे
#रेणूरसोई
गोड शंकरपाळे
हे शंकरपाळे खूप खुसखुशीत व सुंदर लागतात. अगदी एकदा खायला लागलो की खातच रहावे असे वाटते...
करायला अतिशय सोपे व भरपूर होतात..
साहित्य ....
*दूध किंवा पाणी... 1 वाटी
1 वाटी...150 मिली
*साखर... 1 वाटी
*तेल... 1 वाटी
*मीठ... चिमुटभर
*मैदा... 5 वाटी
*तेल... तळण्यासाठी
कृती...
*दूध,साखर,तूप एका भांड्यात एकत्र करून साखर विरघळून घ्या.
*गॅस वर भांडे ठेऊन एक उकळी येऊ द्या, पातेले खाली उतरवून गार होऊ द्यावे.
*आणि मग त्यात मावेल इतका मैदा घालून छान घट्ट पीठ भिजवून घ्यावे. हे पीठ झाकण ठेवून तासभर मुरत ठेवा. मैदा थोडा कमी जास्त प्रमाणात लागू शकतो.... लागेल तेवढाच घालावा.
*एक तास झाल्यावर परत चांगले मळून घेऊन त्याची जाड पोळी लाटून घेऊन चौकोनी शंकरपाळे कापून घ्या.
* शंकरपाळे तेलात मध्यम आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्या.
*गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा.
टीप --
1)ज्यांना दूध नको असेल त्यानी दूध पाणी अर्धे अर्धे घ्या किंवा नुसते पाणी घ्या .
2) सनफ्लॉवर तेल वापरावे.
3) आवडत असेल तर शुद्ध तुपाचे मोहन घालू शकता. पण तेल घालून सुद्धा अतिशय चवदार लागतात.
सर्व पदार्थ खूप छान आहेत
ReplyDeleteमस्त
ReplyDelete