#रेणूरसोई
शेंगदाणे लाडू
शेंगदाण्याचे हे लाडू अतिशय मऊ, चवदार चविष्ट आहेत.
छोट्या-मोठ्या भुकेसाठी उत्तम आहेत लहान मोठे सगळे खाऊ शकतात व सर्वांना अतिशय आवडतात.
गुलाबी थंडीत तर गुळ व दाणे , किंवा तिळ व गुळ अतिशय आवश्यक आहे .... त्वचा स्निग्ध होते....शरीराला उर्जा मिळते... बिस्कीट खाण्यापेक्षा शतपट पौष्टिक....
तेव्हा बघूया शेंगदाण्याचे लाडू...
साहित्य....
*शेंगदाणे.... 2 वाटी
1 वाटी...150 मिली
*गुळ चिरून... 1 वाटी
*साजूक तूप... 1 टिस्पून
*दुध... 1 टेबलस्पून
*वेलची पूड...1/4 टिस्पून... ऐच्छिक
कृती...
*शेंगदाणे मंद आचेवर खमंग भाजून घ्या.
गार झाल्यावर साले न काढता, मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. वाटताना अधूनमधून मिक्सर चे झाकण काढून चमचा वापरून वर खाली करून घ्या. जाडसर वाटले तरी चालेल.
हा शेंगदाणे कूट एका पसरट भांड्यात किंवा परातीत काढून घ्या.
*गॅस वर एका जाड बुडाच्या कढईत तूप घालून लगेच गुळ व दुध घालून, चमच्याने ढवळत राहावे. गुळ विरघळला कि गॅस बंद करावा. हि कृती मंद आचेवर करा.
*वेलची पूड घालावी, व हा पाक परातीतील शेंगदाणे कूट मिश्रणात घालून चमच्याने छान एकत्र करावे. दोन चार मिनिटे छान एकत्र करावे.
*मिश्रण कोमट झाले की हाताच्या सहाय्याने छान मोकळे करून आपल्या आवडीच्या आकाराचे लाडू वळावेत.
*अंदाजे दहा ते बारा लाडू होतात.
Comments
Post a Comment