बुंदी रायता
#रेणुरसोई
#Boondi #Raita #Khari
बुंदी रायता सगळ्यांना खूप आवडतो 😋😋😋😋
पण बाजार ची बुंदी ही चवीला चांगली नसते. मुख्य म्हणजे वारंवार तळलेले तेल वापरले असते जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते.
ताजी घरी बनवलेली बुंदी आणि घरचेच दही घालून केल्यावर अतिशय चवदार अप्रतिम असे बुंदी चे रायते....
साहित्य...
*घरगुती खारी बुंदी...1.5 वाटी
1वाटी ... 150 मि.ली
*घरचे दही... 2 वाटी
*साखर... 2 टीस्पून (ऐच्छिक)
*मीठ... 1/2 टीस्पून
*भाजलेल्या जिऱ्याची पूड.... 1/2 टीस्पून
*हिरव्या मिरच्या... 2
*चिरलेली कोथिंबीर... 1 टेबलस्पून
*चिरलेली ताजी पुदिन्याची पाने..1/2 टीस्पून (ऐच्छिक)
कृती...
* 4 वाटी कोमट पाणी घ्या, (गरम नाही), हे पाणी एका मोठ्या पातेल्यात घाला.
* त्या कोमट पाण्यात खारी बुंदी घाला, फक्त 2 मिनिटे भिजवू द्या.
खारी बुंदी हातात दाबून पाणी पिळून घ्या. बाजूला ठेवा.
या प्रक्रियेमुळे बुंदीतील तेलाचे प्रमाण कमी होईल
* हिरवी मिरची चिरून त्याचे मोठे तुकडे करा.
*दुसऱ्या भांड्यामध्ये दही चांगले फेटून त्यात 1/2 वाटी पाणी घाला.
पाणी घातल्यामुळे रायते घट्ट होणार नाही.
* आता दह्यात चिरलेली हिरवी मिरची, धणे, पुदिन्याची पाने, जिरे पावडर, साखर आणि मीठ घाला.
नीट मिसळा, नंतर भिजवलेली खारी बुंदी घाला. पुन्हा चांगले मिसळा.
* 15 मिनिटांनी सर्व्ह करा.
*अतिशय अप्रतिम बुंदी रायता तयार 🙂
खारी बुंदीची सविस्तर रेसिपी खालील लिंकवर...
http://www.renurasoi.com/2020/05/khari-boondi.html?m=1
ताज्या घरगुती दह्यासाठी, खालील लिंकवर रेसिपी पहा...
Comments
Post a Comment