#रेणू #रसोई
#नारळ #पोहे
माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी...
हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता...
अतिशय झटपट व चवदार चविष्ट....
पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे....
कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात....
साहित्य
*जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून
1 वाटी... 150 मिली
*ओले खोबरे... 3/4 वाटी
*हिरव्या मिरच्या... 4 चिरून
*कढीपत्त्याची पाने...10-12
*लिंबू रस... 2 टिस्पून
*साखर... 1.5 टिस्पून
*मीठ... 1.5 टिस्पून
*तेल... 3 टेबलस्पून
*मोहरी...1/4 टिस्पून
*जीरे... 1/4 टिस्पून
*हिंग पुड... 1/4 टिस्पून
कृती...
*कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी.
*आपले खमंग पोहे तयार...
टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.
Comments
Post a Comment