#रेणुरसोई
#मूग #डाळ #पराठा
मूग डाळ पराठा
हे पराठे अतिशय चवदार आणि चविष्ट लागतात. ते प्रथिनयुक्त असल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहेत.
अतिशय साधे आणि सहज घरी उपलब्ध असलेल्या साहित्य घालून होतात.
तुम्ही हे पराठे नाश्त्यासाठी करू शकता, आॅफीस व शाळेच्या डब्यात, प्रवासाला जाताना पण नेऊ शकता.
ही एक पारंपारिक राजस्थानी रेसिपी आहे.
साहित्य...
*पिवळी मूग डाळ ....1 वाटी
1 वाटी...150 मि.ली
*गव्हाचे पीठ.... 2 वाट्या
*मीठ... 2 टीस्पून
*लाल तिखट... 1 टीस्पून
*हळद... 1/2 टीस्पून
*हिरव्या मिरच्या... 3... बारीक चिरून
* चिरलेली कोथिंबीर... 2 टेबलस्पून
* किसलेले आले... 1 टीस्पून
*हिंग पुड... 1/4 टीस्पून
*पीठात घालण्यासाठी तेल, मोहन... 1 टेलस्पून
*पराठा भाजण्यासाठी तेल... 1/4 वाटी
पद्धत...
* मूग डाळ धुवून पुरेशा पाण्यात २ तास भिजत ठेवा.
२ तासांनंतर डाळ बोटांनी दाबुन पहा, बोटाने दाबून पहा. मउ झाली म्हणजे डाळ भिजली. तयार आहे.
डाळीतले पाणी काढून टाका आणि बाजूला ठेवा.
*आता ही डाळ दुसऱ्या एका परातीत घेऊन त्यात तेल मोहन म्हणून, मीठ, तिखट, हळद, हिंग, किसलेले आले, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला. व्यवस्थित छान एकत्र मिसळा.
* आता वरील डाळीच्या मिश्रणात गव्हाचे पीठ टाकून छान एकत्र करून, मग हळूहळू पाणी घालून पीठ भिजवावे. हे पीठ ५ मिनिटे मळून घ्या. नंतर 15 मिनिटे झाकून ठेवा.
*15 मिनिटांनंतर पुन्हा एकदा पीठ मळून घ्या आणि आवश्यक असल्यास 2 चमचे तेल लावा.
* या पीठाचे 12 समान गोळे करा.
* गव्हाच्या पिठाचा वापर करून पराठा लाटून घ्या, तुम्हाला पाहिजे तितका पातळ लाटता येईल. त्याचा व्यास 5..6" असावा.
* लोखंडी तवा गरम करून हा पराठा घालून दोन्ही बाजूंनी कोरडा भाजून घ्या.
नंतर दोन्ही बाजूंनी १/२ टीस्पून तेल लावून गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या.
गॅसची ज्योत मध्यम असावी.
अशा प्रकारे सर्व पराठे तयार करा.
*लोणचे, दही, चटणी सोबत सर्व्ह करा.
येथे मी गोड कैरीचे लोणचे आणि बटाटा कांदा रायता सोबत सर्व्ह केले आहे.
काही लोकं डाळीचं घट्ट वरण करून पराठे करतात, बाकी सगळं same.
ReplyDelete