#RenuRasoi
#Paneer #Homemade #Pure #Hygenic
Home made is tasty and yummy 😋
The important thing is it's pure and no fear of adulteration.
This recipe is very easy to prepare.
You can prepare the Paneer at home and use by keeping in refrigerator for 2-3 days.
Ingredients...
*Full fat milk... 1 litre
*Vinegar... 2 tablespoons
*Water... 4 tablespoons.
Method...
*Mix vinegar and water.
*Boil the milk in a pan.
*When milk starts boiling add gradually this vinegar water mix and keep stirring with a spoon.
Take care to add this vinegar water mix spoon by spoon only.
*When milk solid separates and yellowish water releases, immediately switch off the Gas. Overboiling will make paneer hard in texture.
*Place one soft cotton cloth in a steel strainer.
Keep this strainer in a big pan so that whey water will get collected in the pan. Strain this milk and Paneer mix from the strainer.
*Immediately fold the cloth with paneer from all the four sides and make a small potli. Insert this potli of paneer in a cold water for 2-3 minutes.
*Then place this potli in a plate and cover with another plate and put a heavy weight on it.
Keep this paneer potli under weight at least for 1 hour.
*After one hour take paneer out of potli and cut as per your choice.
*If you are not using paneer immediately, place this paneer without cutting in a steel container and cover with water and refrigerate. You can use this for 2-3 days.
*Use the strained whey water for making a roti dough or dal. This water is very nutritious.
*You can use lemon juice instead of vinegar.
#रेणुरसोई
#पनीर #घरगुती #शुद्ध #पौष्टिक
घरी बनवलेले पनीर चविष्ट आणि स्वादिष्ट असते 😋
महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते शुद्ध आहे आणि भेसळीची भीती नाही.
ही रेसिपी तयार करायला खूप सोपी आहे.
तुम्ही पनीर घरीच तयार करू शकता आणि २-३ दिवस फ्रिजमध्ये ठेवून वापरू शकता.
साहित्य...
*Full फॅट दूध... 1 लिटर
* व्हिनेगर... २ टेबलस्पून
*पाणी... ४ टेबलस्पून.
पद्धत...
* व्हिनेगर आणि पाणी मिसळा.
* दूध एका पातेल्यात उकळा.
* दूध उकळायला लागल्यावर हळूहळू हे व्हिनेगर आणि पाण्याचे मिश्रण मिसळा आणि चमच्याने सतत ढवळत राहा.
फक्त हे व्हिनेगर चे पाणी हळूहळू मिसळून घ्या. एकदम घालू नये.
*जेंव्हा दुधाचे घन पदार्थ (पनीर ) व पाणी वेगळे होतात आणि पिवळसर पाणी सुटते तेव्हा लगेच गॅस बंद करा. जास्त उकळल्याने पनीर चिवट होईल.
*एक मऊ सुती कापड स्टीलच्या गाळणीत ठेवा.
हि गाळणी एका मोठ्या पातेल्यात ठेवा म्हणजे पनीर चे पाणी खालील भांड्यात जमा होईल. या पाण्याला "व्हे वॉटर "असे म्हणतात. हे पनीर व पाणी गाळून घ्या.
* लगेच पनीर असलेले कापड चारही बाजूंनी दुमडून एक छोटी पोटली बनवा. पनीरची ही पोटली २-३ मिनिटे थंड पाण्यात बुडवून ठेवा.
*नंतर ही पोटली एका ताटली मध्ये ठेवा आणि दुसऱ्या ताटली ने झाकून ठेवा आणि त्यावर वजन ठेवा.
ही पनीर पोटली किमान 1 तास तरी वजनाखाली ठेवा.
*एक तासानंतर पोटलीतून पनीर काढा आणि आवडीनुसार कापून घ्या.
*जर तुम्ही पनीर ताबडतोब वापरत नसाल तर हे पनीर न कापता स्टीलच्या डब्यात ठेवा आणि पाण्याने पूर्ण बुडवून फ्रीजमध्ये तो डबा झाकण लावून ठेवा. तुम्ही हे पनीर 2-3 दिवस वापरू शकता.
*खाली उरलेले "व्हे वॉटर"हे कणिक भिजवण्यासाठी किंवा वरण करण्यासाठी वापरू शकता . हे पाणी अतिशय पौष्टिक आहे.
*तुम्ही व्हिनेगरऐवजी लिंबाचा रस वापरू शकता.
करुन बघतो. किती सरळ, सोपं, सुंदर लिहीलंय.
ReplyDeleteखुप धन्यवाद 🙏🏻
Delete