#RenuRasoi
#Besan #Laddu
Besan Laddu
Besan laddus are all time favourite and tastes divine 😋😋 😋
Laddu made in this way tastes better ... These besan laddu are slightly different in taste and do not stick to the mouth at all.
Ingredients...
*Besan/Chickpea flour... 3 cups
1 cup ... 150 ml.
*Homemade liquid Ghee... 1.5 cups
*Bura Sugar ... 2 cups
*Cardamom powder ... 1/2 tsp
*Cashews and raisins ... 2 tbsp
* Milk ... 2 tablespoons
Method ...
* In an iron kadhai, add liquid ghee and then add gram flour and mix well. Keep roasting continuously over low heat. Take care that flour should not stick to the kadhai.
* After ten ... twelve minutes, the flour will become light and loose in texture .... After roasting for another three or four minutes, it will turn pink and nice aromatic. Switch off the gas.
*Immediately sprinkle milk all over, it will turn out frothy. Mix all the ingredients well again.
* When the flour cools completely, add cardamom powder, dry fruits and Bura sugar and mix well. Roll out the laddus.
You can use various moulds to shape the laddus differently.
* These laddu tastes very soft and delicious.
*Store in container, has a shelf life of 8..10 days.
*Bura Sugar is available in Patanjali, or in grocery stores.
Link for Bura Sugar...
http://www.renurasoi.com/2020/11/bura-sugar.html?m=1
#रेणूरसोई
#बेसन #लाडू
बेसनाचे लाडू
बेसनाचे लाडू आपल्याकडे नेहमीच करतात...
या प्रकाराने केलेले लाडू अतिशय मधुर व सुरेख लागतात...😋😋😋😋
चवीला जास्त छान लागतात...हे बेसनाचे लाडू चवीला थोडे वेगळे आहेत व तोंडात अजिबात चिकटत नाहीत.
लाडू खाताना तुपकट चव पण येत नाही
साहित्य...
*बेसन...3 वाटी
1 वाटी...150 मिली.
*पातळ साजूक तुप... 1.5 वाटी
*बुरा साखर... 2 वाटी
*वेलची पूड... 1/2 टीस्पून
*काजू किसमिस ...2 टेबलस्पून
*दुध... 2 टेबलस्पून
कृती...
*एका लोखंडी कढईत पातळ साजूक तुप घालून मग बेसन घालून, छान एकत्र करावे.
पातळ तुप च घालावे. मंद आचेवर सतत भाजत रहावे. पीठ कढईला चिकटून जळू नये याची काळजी घ्यावी.
*दहा...बारा मिनिटांनी पीठ हलके होऊन सैलसर होईल.... अजुन तीन चार मिनिटे भाजुन गुलाबी रंग आला, पीठ पातळसर झाले की गॅस बंद करावा. पीठ खमंग भाजल्याचा छान सुगंध पण येतो.
*लगेच दुध सगळीकडे घाला, पीठ छान फुलुन येते. सगळे मिश्रण छान एकत्र करून घ्या.
* हे पीठ गार झाल्यावर त्यात वेलची पूड, सुका मेवा व बुरा साखर घालून छान एकत्र करून लाडू वळावेत.
लाडू वळताना वेगवेगळ्या आकाराचे साचे पण वापरू शकता.
*हे लाडू चवीला फार सुंदर लागतात व अजिबात तुपकट चव लागत नाही.
*आठ दहा दिवस छान टिकतात.
*बुरा साखर ही रेसिपी तुम्हाला खालील लिंक वर बोट ठेवले की इंग्लिश व मराठीत मिळेल...
http://www.renurasoi.com/2020/11/bura-sugar.html?m=1
*बुरा साखर पतंजली ची मिळते, किंवा किराणा दुकानात पण मिळेल.
ताई बेसन लाडू खूपच मस्त 😋👌👌👌
ReplyDelete