दाल बाटी
#रेणुरसोई
#दाल #बाटी #चुरमा #टिपोरे
राजस्थानी दाल बाटी चुरमा रेसिपी ही राजस्थानातील एक पारंपारिक रेसिपी आहे आणि घरोघरी आठवड्यात एकदा तरी बनवून खातात...
हिवाळ्यातील अतिशय चवदार आणि चविष्ट असा हा खास बेत 😋😋😋
एक परीपुर्ण थाळी आहे ही...
टिपोरे म्हणजे काय.... हिरव्या मिरचीचा लोणच्या सारखा पदार्थ... हा एक पारंपारिक राजस्थानी पदार्थ आहे....व नेहमीच्या रोजच्या रोज जेवणात पण करून खातात....
हा पुर्ण बेत मी जोधपुरी शैली ने केला आहे.... आमच्या जयपूर मधील वास्तव्यात मी शिकले आहे.
हा मेन्यू/ बेत तुम्ही सुट्टीच्या दिवशी, वीकेंडला, पार्टीसाठी, गेट टूगेदरसाठी करू शकता.
जर तुम्ही मी सांगितले तसेच केले ,तर हमखास उत्तम प्रकारे बेत जमून येईल....
हे प्रमाण साधारण चार व्यक्तींसाठी आहे....
साहित्य
बाटी आणि चुरमा साठी
1 वाटी... 150 मि.ली
*गव्हाचे पीठ.... 2 वाटी
*रवा...2 वाटी
*तेल किंवा तूप.... 4 टेबलस्पून
*मीठ.... 1 टीस्पून
बाटी बुडवण्यासाठी...
साजूक तूप...1/2 वाटी
चुरमा साठी
*गव्हाचे पीठ.... 1/2 वाटी
*रवा....1/2 वाटी
*बुरा साखर किंवा गूळ... 1/4 वाटी
* तूप... 1 टेबलस्पून
*चिरलेले बदाम आणि पिस्ता...2 टीस्पून
*वेलची पावडर... 1/4 टीस्पून... ऐच्छिक
दाल किंवा वरण
*हिरवी/पिवळी मूग डाळ ....1/4 वाटी
*उडीद डाळ ... 1/4 वाटी
*चना डाळ ... 1/4 वाटी
*तूर डाळ... 1/4 वाटी
*हळद .... 1 टीस्पून
*घरचा गरम मसाला ...1/2 टीस्पून
* कोथिंबीर चिरलेली... 1 टेबलस्पून
*लिंबाचा रस... 2 टीस्पून
फोडणीसाठी
*तूप...२ टेबलस्पून
*जीरे... 1/2 टीस्पून
* तिखट.... 1.5 टीस्पून
*हिंग पुड ... चिमूटभर
* प्रथम बाटी तसेच चुरमा बाटी बनवू
*बाटी साठीचे सर्व साहित्य एकत्र करून व्यवस्थित मिसळा.
त्यात हवे तसे पाणी घालून छान पीठ भिजवून घ्या.
*चुरमा बटीसाठी गव्हाचे पीठ आणि रवा एकत्र करून वरीलप्रमाणेच पाणी वापरून पीठ बनवा.
*दोन्ही बाटी पीठ 30 मिनिटे बाजूला राहू द्या.
* पीठ व्यवस्थित मळून घ्या.
बाटीच्या पीठाचे मोठ्या लिंबाच्या आकाराचे अंदाजे सुमारे 15 ते 16 गोळे करून अगदी गोल आकार करा आणि अंगठ्याच्या मदतीने मध्यभागी दाबा.
हे योग्यरित्या शिजवण्यास मदत करेल.
चुरमा बाटीसाठी 7..8 लहान गोळे बनवा आणि ते चुरमा बाटी आहेत हे ओळखण्यासाठी रोलमध्ये आकार द्या
* ओव्हन 180 C ला प्रीहीट करा आणि बाटी ओव्हनमध्ये सुमारे 20 ते 30 मिनिटे दोन्ही बाजूंनी तपकिरी होईपर्यंत बेक करा.
*मी ते माझ्या गॅस तंदूरवर मध्यम आचेवर ३०...३५ मिनिटे हलके तपकिरी होईपर्यंत बेक केले. किंवा
*तुम्ही मोठी कढई किंवा कुकर मध्येआधी गरम करून...2 कप मीठ घालावे, टेबल पॉट स्टँड ठेवा आणि बाटी असलेला अॅल्युमिनियम चे भांडे ठेवा.
साधारण ३० मिनिटे मध्यम आचेवर हलका तपकिरी रंगाचे होईपर्यंत शिजवा.
* बाट्या सर्व बाजूंनी तपकिरी होईपर्यंत फिरवत रहावे. बाटी ला तडे जाऊ शकतात... पण काळजी करण्याची गरज नाही.
*बाटी चार ही बाजूंनी सोनेरी तपकिरी रंगाच्या झाल्या की त्या ओव्हनमधून काढा.
जे झाले आहे ते तुम्ही काढू शकता आणि इतरांना शिजवू शकता.
ओव्हनमधून किंवा गॅसमधून काढल्यावर बाटीला हलक्या हाताने दाबा म्हणजे तिला तडे जातील पण तुकडे होऊन तुटणार नाही.
अशाप्रकारे सगळ्या बाट्या झाल्यावर एका वाटीत किंवा भांड्यात तूप पातळ करून, ही प्रत्येक बाटी त्या तुपात बुडवून एका भांड्या मध्ये काढून ठेवा.
*चुरमासाठी...
चुरमा बाटी आपल्या हातांनी फोडून घ्या आणि मिक्सरमध्ये बाटी चे तुकडे व बुरा साखर/गूळ घालून बारीक पावडर बनवा.
पातळ साजूक तूप, वेलची पूड, व सुक्या मेव्याचे तुकडे घालून व्यवस्थित एकत्र करा.
आपला स्वादिष्ट चुरमा तयार आहे.
डाळ बनवण्यासाठी,
* प्रेशर कुकरमध्ये फोडणीचे साहित्य वगळता सर्व साहित्य घाला.
2.5 वाटी पाणी घालून , दोन शिट्ट्या झाल्यावर गॅस मंद करा आणि 10 मिनिटे मंद आचेवर शिजवावे.
* प्रेशर पूर्णपणे सुटल्यावर, कुकर उघडा आणि चमच्याच्या मागील बाजूने चांगले घोटून घ्यावे.
* मीठ आणि २ कप पाणी घालून छान एकत्र करून, हि डाळ एका भांड्यात काढून घ्या.
* एका छोट्या कढईत तूप गरम करा, त्यात जिरे घालून तडतडू द्या, हिंग पूड घाला. गॅस बंद करा, लगेच तिखट आणि गरम मसाला घाला आणि डाळीवर फोडणी घाला आणि व्यवस्थित एकत्र करून दोन तीन मिनिटे गॅसवर शिजवावे. लिंबाचा रस आणि चिरलेली कोथिंबीर घाला.
बाटीसोबत गरमागरम डाळ सर्व्ह करा.
गरम मसाला रेसिपी साठी या लिंकवर क्लिक करा...
https://www.renurasoi.com/2018/08/garam-masala.html
टिपोरे...
*जाडसर हिरव्या मिरच्या चिरून ....1 वाटी
*तेल... 2 टेबलस्पून
*मोहरी, जिरे, कलौंजी, मेथी आणी शोप प्रत्येकी एक चिमूटभर.
*हिंग पूड... एक मोठी चिमूटभर
*हळद... 1/4 टीस्पून
*मीठ... 1/4 टीस्पून
*आमचूर... 1 टीस्पून
*धणे पूड... 2 टीस्पून
पद्धत...
* कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, मेथी, कलौंजी आणी शोप घालून तडतडू द्या.
*हिंग आणि हळद घाला, नीट एकत्र करा, चिरलेली हिरवी मिरची आणि मीठ घाला.
*एक मिनिट परतून घ्या आणि झाकण ठेवा. 2 मिनिटे शिजवा. झाकण काढा.
*आमचूर आणि धणे पूड घाला.
*एक मिनिट परतून घ्या आणि गॅस बंद करा.
*बाटी किंवा नेहमीच्या जेवणासोबत सर्व्ह करा 😋😋😋😋
*या मिरच्या टिकाव्यात म्हणून फ्रिजमध्ये ठेवाव्यात. तीन चार दिवस टिकतात.
*राजस्थानी दाल बाटी चुरमा हे विकेंडच्या जेवणासाठी किंवा मित्रांसोबतच्या पार्टीसाठीही सर्व्ह करा.
Comments
Post a Comment